तरडगाव(नवनाथ गोवेकर) : सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज तरडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चा ६६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ वेणूताई चव्हाण जुनिअर कॉलेज तरडगाव श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार दि१० रोजी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डांगे एस जी यांनी केले. इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी व नवप्रवेशित विद्यार्थी यांचे लेझीमच्या गजरात स्वागत केले. प्रशालेच्या प्राचार्या काकडे एस जी यांच्या व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला सदर विद्यार्थ्यांच्या नावाचे नेमप्लेट करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते